रक्षणकर्त्यासोबत रक्षाबंधन; युवती सेनेचा उपक्रम

0
4

पिंपरी | दि.१० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील युवती सेनेने रक्षण करणाऱ्या पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. चोवीस तास जनतेची रक्षा करणाऱ्या पोलिसांना राखी बांधली. वाकड पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राखी बांधली.

या कार्यक्रमाचे आयोजन युवतीसेना जिल्हाप्रमुख सायली साळवी यांनी केले होते. प्रियंका चव्हाण, अक्षदा बार्वे, प्रेरणा मिसाळ, वैशाली चांदोळकर, सरिता जगदाने, सिया उबाळे, लता वावगे, अर्चना गुरव इ. पदाधिकारी उपस्थित होत्या.

पोलीस चोवीस तास जनतेचे संरक्षण करतात. त्यांच्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित असून बिनधास्तपणे कोठेही फिरू शकतो. सण, उत्सवात पोलिसांना बंदोबस्तमुळे सुटी मिळत नाही. आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनसाठी जाता येत नाही. त्यामुळे युवती सेनेने पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केल्याचे जिल्हाप्रमुख सायली साळवी यांनी सांगितले.