रक्त तुमचे, जीवदान दुसऱ्याला, चऱ्होली रक्तदान शिबिराचे आयोजन .  

0
20

दि. १८ (पीसीबी) – चऱ्होली येथील नेक्सस गुलमोहर सोसायटीमध्ये सोसायटीच्या वतीने अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये मधुमेह,हिमोग्लोबिन,चाचणी करण्यात आली. आमची सोसायटी नवीन आहे हा आमच्या सासायटीचा  सामाजिक पहिलाच उपकरण असल्याचे  एफ विंगचे अध्यक्ष रवि भेंकी यांनी सांगितले .
आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबवल्याचे  विनोद काळे यांनी सांगितले. सध्या शहरांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळेच आम्ही रक्तदान शिबीर घेतल्याचे अप्पासाहेब भुजबळ यांनी सांगितले.
उद्योजक ओंकार भुजबळ म्हणाले की यापुढे आम्ही असेच समाजमुख शिबीराचे आयोजन करत राहू.जवळपास 70 बाटल्याचे संकलन केले.
मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे समाधान रक्तदात्याला मिळते. देशात रक्त न मिळाल्यामुळे 15 ते 20 टक्के नागरिकांचा जीव जातो, रक्तदान या पवित्र कार्यासाठी तरूणांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे ,*रक्त तुमचे,जीवदान दुसऱ्याला असे समजून रक्तदान करण्याची आवाहन जोगदंड यांनी केले. रक्तदान करून दुसऱ्याचे जिव वाचवले पाहिजे .हेच आपले समाज कर्तव्य आहे.प्रत्येक रक्तादात्याला भेटवस्तु देण्यात आली.अक्षय ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेतल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,नेक्सस गुलमोहर सोसायटीचे रवि भेंकी, आप्पासाहेब भुजबळ ,उद्योजक ओंकार भुजबळ,यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यावेळी संगिता जोगदंड,कैलास चव्हाण, प्रकाश वीर,गुणवंत कामगार शंकर नाणेकर, काळूराम लांडगे,  संदीप सावेकर, सागर ढाणे, बिभीषण भोसले,रवींद्र वाईकर,भोसले पंढरीनाथ,अतिश गायकवाड, प्रविण होरे,सागर भोसले,निलेश नेवरे,आनिल सुपेकर, यांनी रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
यावेळी आधार ब्लड बँकेच  सिद्धया हेगले,कल्पना गिड्डे उपस्थित होत्या.