रकाम करणाऱ्या महिलेने केला घरातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर हात साफ

0
114

दि २० मे (पीसीबी ) – घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर हाथ साफ केला आहे.हा प्रकार 20 मे 2022 पासून सुरू होता. तो 4 फेब्रुवारी 2024 रोजी उघडकीस आला.

याप्रकरणी बनिया रविशंकर रामकृष्ण (वय 43 रा.वाकड)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील कपाटातून फिर्यादी व त्यांच्या मुलाचे सोन्याचे व हिऱ्याचे असे 2 लाख 49 हजार रुपयांचे दागिने चोरी केले आहेत.या मध्ये सोनसाखळी , अंगठ्या , हिऱ्याचे पेंडंट अशा प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.