दि . 12 ( पीसीबी ) – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यानाथ यांच्या सरकारने रंगपंचमी निमित्ताने काही मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी मशिदी ताडपत्रीने झाकण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. आता संभलमधील मुस्लिम समुदायाने रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात येणाऱ्या सुमारे १० मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
संभलचे वरिष्ठ पोलीस आयुक्त म्हणाले की, धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल. हिंदू समुदायाने दुपारी २.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम लोक नमाज पठण करतील. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मशिदी ताडपत्रींनी झाकण्यात येणार आहेत.