येत्या रविवारी पिंपळे सौदागरमध्ये “यशदा पिंपरी चिंचवड हाल्फ मॅरेथॉन २०२४”चे आयोजन.

0
75

शहर वासियांना या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्याचे नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांचे आवाहन.

पिंपळे सौदागर, दि. 12 (पीसीबी) : रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी पिंपळे सौदागर येथील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी सकाळी ०५ वाजता यशदा रियालिटी ग्रुप,नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने “पिंपरी चिंचवड हाल्फ मॅरेथॉन २०२४” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयोजकांमार्फत हि स्पर्धा यशस्वीरीत्या राबवली जात असून हे या स्पर्धा आयोजनाचे ४ थे वर्ष आहे .

सदर मॅरेथॉन ५ किमी ,१० किमी आणि २१ किमी अश्या तीन कॅटेगरी मध्ये घेण्यात येणार आहे .
कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पासून ही मॅरेथॉन सुरु होणार असून याचा मार्गक्रम कुणाल आयकॉन रोड,शिवार चौक,साई चौक,रक्षक चौक सांगावी फाटा ते पुनः याच दिशेने उलट फिरून कुणाल आयकॉन रोड,शिवार चौक, पी के चौक ते कोकणे चौक, गोविंद यशदा चौक , सुदर्शन चौक , नाशिक फाटा उड्डाण पूल ते एम.आय.डी.सी. कॉर्नर भोसरी मार्गे ते उलट याच दिशेने बी.आर.टी.एस. मार्गावर पुन्हा फिरून कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर या मॅरेथॉनचे समापन होणार आहे.
आपली शारीरिक तंदरुस्ती तसेच आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने मॅरेथॉन सारख्या खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारी अध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना केले आहे .