येत्या बुधवारी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

0
3

पिंपरी : ईशा नेत्रालय आणि वर्षा सातुर्डेकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ येत्या बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक नंदकुमार सातुर्डेकर यांनी ही माहिती दिली.

बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ईशा नेत्रालय, प्रीमियर प्लाझा, पहिला मजला,बिग बाजार, कार्निवल सिनेमाच्या बाजूला जुना पुणे मुंबई महामार्ग, चिंचवड स्टेशन पुणे येथे हे शिबिर होणार आहे.

नेत्रचिकित्सा  शिबिराचे उद्घाटन  ईशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात येणार असून त्याबरोबरच  डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे,डॉ. जयशील नाझरे मार्गदर्शन करणार आहेत. नेत्रालयाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यशवंत बो-हाडे यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती संयोजक नंदकुमार  सातुर्डेकर यांनी दिली. शिबिराच्या आयोजनासाठी सौ. राधा सातुर्डेकर, सौ. कोमल माटे, सौ.रेश्मा बोबडे यांनी पुढाकार घेतला आहे.