येत्या दीड वर्षांत १० लाख सरकारी नोकऱ्या

0
209

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषण

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – मोदी सरकार येत्या काळात रोजगार निर्मितीवर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हे निर्देश दिले आहेत, की येत्या दीड वर्षांमध्ये साधारण १० लाख नोकरभरती केली जावी. या लोकांना सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयामध्ये काम मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्वीट केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातल्या मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी निर्देश दिले आहेत की येत्या दीड वर्षांमध्ये १० लाख नोकरभरती केली जावी.

गेल्या वर्षी राज्यसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता हा आकडा साधारण १० लाखांच्या आसपास गेला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत.