येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून नागरिकाला बेदम मारहाण

0
82
crime

सांगवी, दि. १९ (पीसीबी)

येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका 45 वर्षीय नागरिकाला तिघांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) रहाटणी गाव येथे घडली.

याप्रकरणी दीपक व्यंकट कांबळे (वय 42 रा. रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पंचवीस वर्षीय तरुणी, राहुल गायकवाड (वय 27) व टफी (वय 35, सर्व रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे त्यांची पत्नी व बहिणीला घेऊन घरी जात होते. यावेळी रस्त्यात खेळणाऱ्या मुलांना त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडा असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी काठीने फिर्यादी, फिर्यादीची बहीण व पत्नीला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच नखांनी फिर्यादी यांना मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.