युवा सेनेतर्फे थेरगाव परिसरात तिरंगा रॅली; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
402

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झेंडा वंदनानंतर थेरगाव परिसरात दुचाकीवर तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली आणि संतोष गुलाब बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवास्थानापासून रॅलीला सुरुवात झाली. दत्तनगर, थेरगाव गावठाण, काळेवाडी फाटा, गुजरनगर, मंगलनगर, शिव कॉलनी, गणेशनगर, डांगे चौक या मार्गे रॅली काढली. डांगे चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रॅलीचा समारोप झाले. भारत माता की जय,वंदे मातरम अशा गर्जनांनी परिसर दणाणून सोडला.

300 दुचाकीवर कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत केले. रांगोळीच्या आकर्षक पायघड्या घातल्या होत्या. युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते थेरगाव परिसरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.