युवा सेनेच्या ‘शिवदिपोत्सवाने’ उजळून निघाला थेरगावातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

0
213

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने दीपावली सणानिमित्त थेरगावातील डांगे चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळा येथे ‘शिवदिपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी पुतळा परिसर उजळून निघाला. या शिवदिपोत्सवाला महिला, युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बुधवारी (दि.26) सायंकाळी झालेल्या या शिवदिपोत्सवाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सरिता श्रीरंग बारणे, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, धनाजी बारणे, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, उद्योजक महेश बारणे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, माजी नगरसेविका विमल जगताप, युवा सेना पदाधिकारी राजेंद्र तरस , निखिल येवले, बशीर सुतार, अंकुश कोळेकर, माऊली जगताप, सोमनाथ गुजर, दीपक गुजर, संग्राम धायरीकर, बाळासाहेब वाघमोडे, नंदू जाधव, रंजना साळवे, पुष्पलता फुले, दिपाली गुजर, सुंदराबाई कांबळे, नूरजहा शेख, अनिता जोग, शेटके, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा सेनेच्या वतीने दरवर्षी दिपावली सणानिमित्त थेरगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळा परिसरात दिपोत्सव साजरा केला जातो. कोरोना महामारीमुळे दोनवर्षे दिपावली सण साधेपणाने साजरा केला. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाचा अंधःकार दूर झाल्याने सर्वत्र मोठ्या उत्साहात दिपावली सण साजरा होत आहे. युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने यंदा मोठ्या उत्सहात शिवदिपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी पुतळा परिसर उजळून निघाला. दिपोत्सवाला महिला, ज्येष्ठांसह, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.