महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – युवा संघर्ष यात्रेच्या नागपूर येथील समारोप समारंभात नागपूर पोलिसांकडून युवकांवर लाटी हल्ला करण्यात आल्याचे निषेधार्थ तसेच कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री रोहितदादा पवार यांना संघर्ष यात्रेच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस तसेच पिंपरी चिंचवड विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या “युवा संघर्ष यात्रेद्वारे राज्यातून 800 किलोमीटर पायी प्रवास करून आमदार रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत प्रश्न घेतले. या निमित्ताने बेरोजगार युवक, गोरगरीब शेतकरी, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न यावर सरकार ने योग्य ती ठोस पावलं उचलावी यासाठी निवेदन सादर करण्यासाठी
विधान भवनात जात असताना. नागपूर पोलिसांनी युवकांवर लाटी हल्ला चढवला तसेच बेकायदेशीरपणे आंदोलनकर्त्याना अटक केली या केलेल्या अटकेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातील युवा येणाऱ्या निवडणुकीत या जुलमी सरकारला योग्य तो धडा शिकवेल. अशा शब्दात त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
कष्टकऱ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथजी नखाते यांनी कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे तुम्ही आमच्या नेत्यांवरती लाठी चार्ज व अटक करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केलात इथून पुढच्या काळात असे घडले तर पूर्ण राज्यभर आम्हीं आंदोलन घेणार असे या ठिकाणी त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री राहुल आहेर यांनी सरकारने केलेल्या
अटकेच्या निषेधार्थ सरकारवर जोरदार हल्ला चढवला व पुन्हा रोहित दादांना या पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न कराल पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख,कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,शहर उपाध्यक्ष अनिल भोसले महिला पदाधिकारी.. कार्याध्यक्ष शारदा चोकशी. चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसोले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पूजा आल्हाट, भोसरी कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, उपाध्यक्ष रेखा मोरे, कीर्ती तोरणे, दिपाली केदारी, अलका कांबळे, विश्रांती ताई पाडाळे, सुप्रिया जगताप, प्रगती सिनलकर, प्रियांका आल्हाट, लता मकासरे, नीता महानवर, जनाबाई जाधव ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी पदाधिकारी सरचिटणीस तुषार गाडे सचिव ऋषभ भडाळे उपाध्यक्ष ऋषिकेश सत्रे मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर पिंपरी अध्यक्ष ऋतिक गायकवाड महाविद्यालयाध्यक्ष अभिषेक कांबळे सुरज देशमाने भोसरी विधानसभा संकेत वाघमारे विश्वजित लोंढे,मनोज माने व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते