युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा

0
171

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा युवासेनाप्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी दिली.

ताथवडे येथील औंध रावेत रोडवरील सिल्वर बँक्वेट हॉल येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता हा मेळावा होणार आहे. युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासह पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड मावळ संपर्क प्रमुख लतिका पाष्टे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिताताई तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे, निलेश मुटके, धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव आदींसह पक्षाचे उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक या मेळाव्य़ास उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसंदर्भात मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिका-यांशी पक्षाचे प्रमुख नेते संवाद साधणार आहेत. प्रमुख पदाधिका-यांकडून कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्य़ास उपस्थित राहावे, असे आवाहन शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केले आहे.