युनियन सोड म्हणत एकास मारहाण

0
313

पिंपरी,दि.१७ (पीसीबी) -दुचाकीवरून घरी जात असेलल्या एका कामगाराला युनियन सोड, कंपनी सोड असे म्हणत तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) रात्री सम्राट चौक, लालटोपीनगर पिंपरी येथे घडली.

संजय बापू कदम (वय ५१, रा. एमआयडीसी चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामावरून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात होते. लालटोपीनगर मधील सम्राट चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून एक दुचाकी थांबली. त्यावरील तिघांनी फिर्यादी यांना युनियन सोडून दे, कंपनी सोडून दे असे म्हणत प्लास्टिक पाईपने डोक्यात, पायावर मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.