युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल चे चौदावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे…..

0
309

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवड या शाळेचे चौदावे वार्षिक स्नेहसंमेलन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. माननीय श्री शंकर भाऊ जगताप – भाजपा शहराध्यक्ष, आर्किटेक्ट श्री गौतम शहा – मेंबर रोटरी आकुर्डी, सौ दर्शना तारक – मेंबर रोटरी आकुर्डी, अश्विनीताई चिंचवडे – नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपा, श्री ऋषिकेश चिंचवडे चेअरमन पवना एज्युकेशन सोशल ट्रस्ट, श्रीराज चिंचवडे, श्री रामचंद्र जमखंडी, श्री. राजेंद्र पवार, श्री संतोष राका, श्री. दुर्गेश देशमुख, श्री. माणिक म्हेत्रे, स्वाती पवार, जयश्री ढोरे सदस्य पवना एज्युकेशन सोशल ट्रस्ट आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक गजानन चिंचवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी दुवेदी यांनी सर्वांचे स्वागत केले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सादरीकरणामध्ये पर्यावरण जतन, संवर्धन, प्लास्टिकचा वापर टाळा, प्रदूषण आदी विषयावर भर दिला. “पर्यावरणाचा करूया सन्मान, कारण हेच आहे आपल्यासाठी वरदान” या विषयावर नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री शंकर शेठ जगताप यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी पर्यावरणाचे रक्षण, पाण्याची जपणूक करावी अशा भावना त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केल्या.शाळेतील विद्यार्थी कु. ऋषिका होले, आनम शेख, प्रज्ञा शिंदे, हर्षवर्धन वाघमोडे यांनी विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे, मुख्याध्यापिका रजनी दुवेदी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. सर्वांनीच वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला. सौ विशाखा वांगीकर यांनी आभार मानले.“वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.