या वर्षीच्या गणपती मध्ये आम्ही आणला आहे एक अप्रतीम उपक्रम !गणपती चे डेकोरेशन आणि तेहीE-WASTE मधून!

0
118

दि. 08 (पीसीबी) – भोसले नगर मधील आमची सोसायटी 10 Kastukunj सोसायटी नेहमीच नव-नवीन उपक्रम करणारी अगदी अग्रगण्य ! या वर्षीच्या गणपती मध्ये आम्ही आणला आहे एक अप्रतीम उपक्रम !
गणपती चे डेकोरेशन आणि तेही
E-WASTE मधून !
या करिता अगोदर E-WASTE संकलन drive चालू केला, सोसायटी मधील यंग Brigade ने घरोघरी जाऊन , मेंबर्स कडून
e waste गोळा करायला सुरुवात केली.
जुने कॉम्प्युटर, कीबोर्ड, मॉनिटर, फ्लॉपी, CD DVD ,जून्या कॅसेटस , UPS , जुन्या बॅटरीज, लॅपटॉप्स, जुने मोबाईल, जुने रेडियो अगदी सर्वच इलेक्ट्रॉनिक्स जे जे वापरत नाही असे सर्व काही ..
लोकानी सुद्धा उस्फूर्त सहयोग दिला बर्‍याच वस्तू जमा झाल्या आणि अजूनही मेंबर्स पाठवीत आहेत..
संकल्पना एकच होती, E-waste संकलन करायचे , लोकां मध्ये जागरूकता आणायची, E-waste कुठेही न टाकता अधिकृत recycleकरणार्‍या agency ला द्यायचे ..

शक्य झाल्यास त्या वस्तू recycling करून काही नवीन वस्तू बनवायच्या..

आयडिया एकदम छान झाली..मुलानी सर्व जुन्या वस्तु मधून आमच्या गणपति चे झक्कास डेकोरेशन केले.
या मधून गणपती साठी चौरंगा साठी कॉम्प्युटर वापरला, अनेक decorative दिवे बनवले, फुलांच्या ठिकाणी CD वापरुन अतिशय सुरेख माळा बनविल्या, मुलानी दोन सुंदर रोबोट सुद्धा बनवले..
थोडक्यात जुन्या वस्तू वापरून आपण बरेच कही नविन बनवू शकतो..
मुलानी E-waste मधून केलेले गणपतीची केलेली sajavat अगदी भन्नाट झाली आहे…
आपण एकदा आवर्जून भेट द्यावी!
आमच्या सोसायटी मधील गणेश visargen झाल्या नंतर संकलन झालेले सर्व E-WASTE आम्ही चांगल्या recycling agency ला Donate करणार आहोत.

अनिल फेरवाणी