…या ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली

0
502

– मंत्री तानाजी सावंत यांचे वादग्रस्त विधान
मुंबई, दि. २६ (पीसीबी) : शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली या त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तुम्हाला आत्ताच आरक्षणाची खाज सुटली का? असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या मोर्चावर टीका करण्यात आली, मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आलं अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर मराठा समाजाच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.