या प्रकरणात आता मोदींनी माफी मागितली पाहिजे …राहुल गांधींची जळजळीत प्रतिक्रिया

0
116

राहुल गांधी यांनी प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये जेडीएसचे उमेदवार प्रज्ज्वलल रेवण्णाच्या कथित सेक्स टेप प्रकरणावरुन आणि पेन ड्राईव्ह प्रकरणावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी कर्नाटकच्या शिवमोगामध्ये पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी म्हटलं आहे की रेवण्णा सेक्स टेप प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे.

काय म्हणाले आहेत राहुल गांधी?
“प्रज्ज्वल रेवण्णा मास रेपिस्ट अर्थात सामूहिक बलात्कारी आहे. कारण त्याने शेकडो महिलांचं शोषण केलं आहे. महिलांचं शोषण करणाऱ्या प्रज्ज्वल रेवण्णासारख्या माणसाला मोदी पाठिंबा देत आहेत, निवडून द्या म्हणत आहेत. त्यांनी याप्रकरणी उत्तर दिलं पाहिजे तसंच देशातल्या तमाम महिलांची माफी मागितली पाहिजे.” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
“प्रज्ज्वल रेवण्णाने ४०० महिलांवर सामूहिक बलात्कार केला आहे. अशा माणसाला निवडून द्या असं मोदी सांगत आहेत. या प्रकरणी मोदींनी देशातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे.” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रज्ज्वल रेवण्णा कथित सेक्स स्कँडल आणि २९७२ क्लिप असलेल्या पेन ड्राईव्हमुळे अडचणींत आले आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच त्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले होते.

कोण आहेत प्रज्वल रेवण्णा?
प्रज्ज्वल रेवण्णा हे देवेगौडा कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे नेते आहेत. कर्नाटकचे पाटबंधारे विभागाचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे ते पुत्र आहेत. एच. डी. रेवण्णा आणि एच. डी. कुमारस्वामी हे दोघं भाऊ आहेत. त्यामुळे कुमारस्वामी हे प्रज्ज्वल रेवण्णांचे काका आहेत.प्रज्ज्वल रेवण्णांनी बंगळुरुतल्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेडिकल इंजिनिअरिंग केलं आहे. राजकारणातही ते सक्रिय आहेत.JDS या पक्षाचे सचिव म्हणून प्रज्ज्वल रेवण्णांची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली. आता त्यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत