‘या’ दोन नेत्यामुळे महायुती गोत्यात? एकच घरात दोघांनी उमेदवारी मागितली

0
2

मुंबई, दि. 18 (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये दोन नेत्यांच्या मागणीमुळे अडचण निर्माण झाली असल्याचं चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे या दोन नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीला गोत्यात आल्याची चर्चा आहे. एकच घरात दोघांना उमेदवारी मागितली जात असल्याने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. काँग्रस आणि राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. पण आता भाजपमध्येच एका घरातील दोन व्यक्तींकडून उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजप यावर काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबातील दोघांना उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली जात आहे. अहमदनगरमधील शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आहेत. सातवेळा ते शिर्डीमधून निवडून आले आहेत. ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे लोकसभेला पराभूत झाले. त्यामुळे सुजय विखे हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. संगमनेर या विधान मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी सुजय विखे यांनी दर्शवली आहे. पण एकाच घरात दोघांना तिकीट मिळणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या घरातही दोन तिकीटांची मागणी होत आहे. राणेंची दोन्ही मुलं विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नितेश राणे यांना कणकवलीतून तर निलेश राणे हे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता एकाच घरातून दोन – दोन तिकीटांची मागणी केली जात असल्याने भाजपममध्ये पेच निर्माण झाला आहे.