देशाचे पंतप्रधान भेकड आहेत, प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

0
191

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – देशाच्या ऐकतेसाठी हजारो किलोमीटर चालणारा आणि देशासाठी शाहिद झालेल्या पंतप्रधानाचा मुलगा देशाचा कधीही आवमान करू शकत नाही. हवे तर माझ्यावर खटला भरा मला कारागृहात पाठवा पण वस्तुस्थिती ही आहे या देशाचे पंतप्रधान भेकड आहेत. ते त्यांच्या सत्तेमागे दडत आहेत ते उर्मट आहेत. हिंदुत्व ही एक सनातन परंपरा आहे. या देशालाही तेवढीच जुनी परंपरा आहे, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज घाट येथे सुरु असणाऱ्या सत्यग्रहात सहभागी झाल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या पंतप्रधानना काही प्रश्न माझ्या भावाने विचारले त्याची उत्तरे त्यांना देता आली नाहीत ते घाबरले. आणि जे अहंकारी असतात हुकूमशहा असतात ते काय करतात? त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर ते अधिकाराचा गैरवापर करतात. जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. याचा तुम्ही कधी विचार केलाय डोळे उघडा हे संपूर्ण सरकार त्यांचे मंत्री, खासदार… ते एका व्यक्तीला वाचावण्याचा का प्रयत्न करत आहेत. का या अदानीला संपूर्ण देशाची संपत्ती दिली जात आहे? त्याचे नाव घेतल्यावर तीळपापड का होतो? आणि त्याला वाचवण्याची धडपड सूरू होते, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

आम्हाला ते परिवारवादी म्हणून हिणवतात. मग प्रभू राम कोण होते? त्यांना वनवासात पाठवले. त्यांनी आपला परिवार आणि आपल्या भूमिसाठी आपला धर्म निभावला. तो त्यांचा परिवारवाद होता का? पांडवनी परिवारवादाला प्रोत्साहन दिले का? ते त्यांच्या परिवाराच्या मूल्यांसाठी लढले. या देशासाठी आमच्या कुटुंबि्यांनी बलिदान स्वीकारले, त्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे का? आमचा अपमान केल्याने आम्ही खचून जाऊ… त्यासाठी यंत्रणा मागे लावू… पण हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही घाबरणार नाही आम्ही अधिक मजबुतीने लढू, असे त्यांनी ठणकावले.