‘या’ गंभीर आजाराबाबत सलमानने स्वतः केला खुलासा, म्हणाला आत्महत्येचा विचार…

0
7

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच त्याचा फिटनेसही कायम चर्चेचा विषय राहिला आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही सलमानने ज्या प्रकारे आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवली आहे, त्याला अनेक तरुण अभिनेतेही आदर्श मानतात. मात्र एक काळ असा होता, जेव्हा सलमान एका अत्यंत वेदनादायक आजाराशी लढा देत होता, हे अनेकांना माहिती नसेल.

सलमानला सुसाइड डिसीज?

या गंभीर आजाराबाबत स्वतः सलमानने 2017 साली दुबईमध्ये ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाच्या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते. त्यावेळी त्याने उघडपणे कबुल केलं की, तो ट्रायजेमिनल न्यूरालजिया या दुर्मिळ आणि वेदनादायक आजाराने त्रस्त होता. या आजाराला ‘सुसाइड डिसीज’ असेही म्हणतात. सलमान म्हणाला (salman khan) होता, “या आजारामुळे सतत आत्महत्येचे विचार मनात यायचे. बोलताना खूप त्रास व्हायचा. मला या परिस्थितीशी लढा द्यावा लागला आणि हे जाणवलं की अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे.”

वेदनादायक आणि मानसिकदृष्ट्याही कठीण आजार-

ट्रायजेमिनल न्यूरालजिया हा विकार मुख्यतः चेहऱ्याच्या नर्व्हवर परिणाम करतो. यामुळे रुग्णाला प्रचंड तीव्र वेदना होतात, जणू काही शरीराला इलेक्ट्रिक शॉक दिला जात आहे, अशी भावना निर्माण होते. या वेदना इतक्या असह्य असतात की अनेक रुग्ण मानसिकदृष्ट्याही खचून जातात.

या आजारामुळे अनेकदा रुग्णांना व्यवस्थित बोलताही येत नाही. सलमान खानने यासाठी अमेरिकेत उपचार घेतले होते. आज सलमान पुन्हा जोमाने काम करत आहे, ते पाहता त्याच्या मानसिक आणि शारीरिक लढ्याचं कौतुक करणं अपरिहार्य ठरतं.

दरम्यान, सलमान खान (salman khan) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘सिकंदर’ या अॅक्शनपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदॉस (A.R. Murugadoss) यांनी केले आहे. या सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांचाही सहभाग आहे.