याद राखा नामदेव ढाके हा फक्त व्यक्ती नाही, आम्हा सर्व खान्देशी लोकांचे नेते आहेत…

0
797

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील दीर-भावजयींचा संघर्ष उफाळून आल्याने कार्यकर्त्यांची कुचंबना होऊ लागली आहे. आमदार आश्विनी जगताप यांना पत्रकार परिषदेत योग्य बैठक व्यवस्था नसल्याने त्यांची अवमान झाल्याची भावना होती. भर पत्रकार परिषदेत आमदार जगताप यांनी मुख्य संयोजक म्हणून पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके यांना कठोर शब्दांत सुनावले होते. मी आश्विनी जगताप आहे, पाठित वार करू नका, अशा शब्दांत त्यांनी ढाके यांना सर्वांच्या समोर इशारा दिल्याने वातावरण तापले. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांच्या समोर आमदार समर्थक माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांनी ढाके यांच्यावर तोंडसुख घेतले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी पक्षात वहिनींना सन्मान दिला जात नसल्याने नाराजीचा सूर लावला आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्यासह अनेकांनी नामदेव ढाके यांच्यावर आसूड उगारले. महिला आमदार आश्विनीताईंचा अवमान हा एकप्रकारे भाजपमधील मनुवादी प्रवृत्तीचे द्योतक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष ज्योति निंबाळकर यांनी केली. एकूणच सर्व प्रकऱणात नामदेव ढाके हा नाहक टार्गेट झाले.

दरम्यान, आता ढाके यांच्या समर्थनासाठी खांन्देश बांधवांनी मोट बांधायला सुरवात केली आहे. सोशल मीडियावरच्या बातम्यांमध्ये प्रतिक्रीया देताना शहरात भाजप वाढविण्यामध्ये ढाके यांचे किती मोठे योगदान आहे याची जाण ठेवा आणि त्यांना बदनाम करणे थांबवा अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल असा थेट इशारा भाजपला दिला आहे. या प्रतिक्रीया खूपच बोलक्या आहेत.

शशिकांत पाटील म्हणून एक कार्यकर्ता म्हणतो, एकेकाळी पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला अतिशय बिकट परिस्थिती होती, आणि त्या परिस्थितीतही खांद्याला खांदा लावून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाला साथ दिली एके एक पाण्याचा थेंब घोडा करून जशी ओंजळ भरली जाते त्याच अनुषंगाने एक एक कार्यकर्त्याला जवळ करून भाजपाची पक्ष संघटना वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आदरणीय श्री. नामदेव ढाके साहेबांचा सुद्धा “खारीचा” वाटा आहे पक्ष संघटना वाढवण्यासाठी रात्र दिवस ज्यांनी काम केले आणि आजही काम करत आहेत. काम करता करता विचारांची देवाण-घेवाण करत असताना मतभेद एखाद्या वेळेस असु शकतील ? पण ज्यांनी स्वतःचं अस्तित्व शून्यातून निर्माण केले.

प्रविण उत्तेकर -वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत अशा स्वच्छ आणि प्रामाणिक पारदर्शक निष्ठावंत भारतीय जनता पार्टी चे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.नामदेवराव ढाके साहेबांना कोणीही षड्यंत्र रचून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये …..

भारतीय जनता पार्टी चा विजय असो….

भाजपची ओळखच आहे पाठीत खंजीर खुपसन्याचीआवाज उठवणारे जेव्हा राष्ट्रवादीत होते ना तेव्हा पासून ढाके आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्यांचा सोबत भाजपा सोबत आहेत… तुम्ही ४-५ टर्म निवडून येऊन या पक्षात फरक पडत नाही… भारतीय जनता पक्ष आहे हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे… भाऊ हयात होते तोवर तुम्हाला का ढाके ना बोलता आले नाही ? भाऊ हयात असते तर तुमचा आवाज निघाला असता का ? हे प्रश्न स्वतःला विचारा… भाऊंना ढाकें वर तेव्हा पण विश्वास होता आणि तोच विश्वास शंकर शेठ आणि भाजपाला आहे म्हणून तुमची राजकीय पोळी शिजत नाहीये..