यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरात मधून आणला जाणार आहे खास तराफा

0
2

दि. ५ (पीसीबी) – राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला असून आता गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. उद्या, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून काही घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडेल. अनंत चतुदर्शीच्या अनुषंगाने गिरगाव चौपाटीवर मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या गणपतीचे उद्याही थाटात विसर्जन होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.


मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जनाला लालबाग- परळ गिरगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लालबागचा राजाआणि अन्य मंडळांनी पुढाकार घेत फेस डिटेक्टर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात.लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, मुंबईचा राजा, राजा तेजुकायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते.या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. ध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी व जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव ‘फेस डिटेक्टर’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अन्य मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर व अन्य यंत्रणा लावण्यात आली आहेत.

दरम्यान लालबागाच्या राजाच्या विसर्जनसाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी विसर्जनसाठी वापरला जाणारा तराफा यंदा मात्र वापरला जाणार नाहीये. तर यावर्षी मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आला असून तो 360 अंशात फिरतो. तसेच विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहुबाजूला असणाऱ्या स्पिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडतानाही वापरायला मिळणार आहेत.या तराफ्याला समुद्रात नेम्यासाठी आता अन्य दुसऱ्या बोटीची मदत लागणार नसून यंदा ये वेगळेपण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागले आहे.