म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

0
448

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – कोणत्याही अधिकारा शिवाय एका ग्राहकाला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवत तब्बल 2 लाख रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे. यापकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि फसवणूक 24 जून 2022 ते आज अखेर पर्यंत पिंपरी येथे केली गेली आहे.

जितेंद्र नामदेव कांबळे (वय 41 रा.कोल्हापूर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी उमाकांत रामदास ढाके (वय वय 54 रा.पिंपरी) व शुभम उमाकांत ढाके (वय 27 रा.पिंपरी) या बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी कोणताही अधिकार नसताना म्हाडा मधून घर मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 3 लाख रुपये घेतले. मात्र आज अखेरपर्यंत घर दिले नाही. पैशांची मागणी केली असता केवळ 1 लाख रुपये परत केले. फिर्यादीची 2 लाख रुपयांची फसवणूक केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.