म्हणे, अजितदादांचे हे ११ आमदार फुटणार

0
180

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांने व्यक्त केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी फूट पडणार असून एक गट भाजपमध्ये तर एक गट शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या तीन-चार दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागा वाटपही अंतिम टप्यात आले आहे. त्यातकेच आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहेत.

महायुतीत तर जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकींनंतर महाराष्ट्रात विधानसभेचीदेखील निवडणूक असणार आहे. त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली. होती अजित पवार गट वेगळा होऊन सत्तेत सहभागी झाला होता. या दोन भूकंपाचे पडसाद आतापर्यंत उमटत असताना आता पुन्हा तिसऱ्या भूकंपाचे संकेत अतुल लोंढे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अजून एक फूट पडणार असल्याचा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करु शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात, असा दावा लोंढे यांनी केला आहे. भाजप सर्वांना धोका देईल. त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार आहेत. अजित पवार गटातील तब्बल 12 नेते हे भाजपात प्रवेश करतील, असा धक्कादाक दावा लोंढे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार असल्याची सूत्रांची माहिती, असा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर पोस्ट करून केला असल्याने त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

येत्या काळात अजित पवार गटातले 12 बडे नेते भाजपात (Bjp) जाणार असल्याचा त्यांचा दावा कितपत खरा आहे? हे आगामी काळात स्पष्ट होईलच. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून