..म्हणून यांचा मूळव्याध ठसठसतोय, भाजपचे अमित गारखे यांची शिवसेनेवर टीका

0
216

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यावरुन सोशल मीडियावरील ज्या लोकांचे तात्विक मुळव्याध ठसठस करत आहे, त्यांना कदाचित माहिती नसेल की वाजपेयींचे सरकार लोकसभेत १ मताने कोसळले होते. लोकसभेचा प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे.अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रभाव तीन लोकसभा मतदारसंघात आहे, असे मत भाजपचे पिंपरी विधानसभा प्रभारी अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिध्दीपत्रात गोरखे म्हणतात, हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी सुष्मा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उबाठा गटात आल्यानंतर तिला उद्धव ठाकरे यांनी नेता बनवले,तेव्हा उबाठा गटातील जुन्या नेत्यांची काळजी कोणाला वाटली नाही. आज सुष्मा अंधारे नेता बनून महाराष्ट्रात फिरते आणि उबाठा गटाचे जुने नेते तिच्या मागे लाचारा सारखे चालतात. इतर राजकीय पक्षांचे थातुरमातुर नेते उबाठा गटात आले की ते शिवबंधन,पण भाजपमध्ये इतर राजकीय पक्षांचे मातब्बर नेते आले की ते अनैतिक राजकारण…

महाआघाडीत इतर पक्षांचे नेते आले की ते पवारांचे बेरजेचे राजकारण,पण भाजपमध्ये नेते आले की ते पक्षांची फोडाफोडी. सत्तेशिवाय विचारधारेचे तुणतुणे वाजवणे व्यर्थ असते.भाजप सत्तेवर होता म्हणूनच राममंदिर निर्माण झाले,कलम ३७० हटविले,बाॅम्बस्फोट थांबले,सर्जिकल स्ट्राईक झाली.

हिंदुत्व देशात रुजवण्यासाठी भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे,आणि सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे. तत्व आणि लोकं काय म्हणतील हा आदर्शवादी विचार करत राहिल्यामुळेच भाजप ६० वर्षे सत्तेपासून दूर राहिला.त्यामुळे राजकारणाची काडीमात्र जाण नसलेल्या सोशल मीडियावरील नवशिक्या लोकांनी व्यवहारिक राजकीय पक्ष बनलेल्या भाजपला उपदेश देऊ नये, असा टोला गोरखे यांनी लगावला आहे.