…म्हणून मी पोटनिवडणूक लढतोय – राहुल कलाटे

0
227

चिंचवड, दि.१० (पीसीबी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी माघार घेण्याबाबत नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही आमचा अनादर करु नका असे कार्यकर्त्यांचे म्हणने होते. त्यामुळे मला चिंचवडच्या जनतेचा आदर करणे क्रमप्राप्त होते.  जनतेची लोकभावना, जनतेच्या पाठिब्यांवर मी निवडणुकीला सामोरे जात असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे. उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे माझ्याशी काही गोष्टी बोलले. काही जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली. त्यांच्याबाबत मी आदर व्यक्त करतो. परंतु, आपण मागचे काही दिवस मी लढावे यासाठी मला चिंचवडच्या लोकांचे रेटा होता.

मागीलवेळी मला 1 लाख 12 हजार मते मिळाली. त्यावेळी लोकांच्या मनात वेगळी भावना होती. भाजपची प्रचंड मोठी लाट, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा लोकांवर दबाव होता. केंद्र, राज्य, महापालिकेत भाजपची सत्ता होती. असे असतानाही मतदार माझ्यासाठी बाहेर आले. पोटनिवडणूक लढविण्यासाठी माझ्या मागे मतदारांचा रेटा होता. नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही आमचा अनादर करु नका असे कार्यकर्त्यांचे म्हणने होते. चिंचवडच्या जनतेचे आदर करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे जनतेची लोकभावना, जनतेच्या पाठिब्यांवर मी निवडणुकीला सामोरे जात असल्याचे कलाटे यांनी सांगितले.