… म्हणून नामांकित कंपनीतील कामगारांनीच चोरली 40 हजारांची केबल वायर

0
487

दिघी, दि.२४( पीसीबी) – टाटा कम्युनिकेशन कंपनीची 40 हजारांची केबल वायर तिघांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 23) पहाटे टाटा कम्युनिकेशन कंपनी, दिघी येथे घडली.

सतीश नरहरी चव्हाण (वय 35, रा. हडपसर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश परमात्मा सोनी (वय 21, रा. आकुर्डी), रामजी चव्हाण, कल्लू, सब्बू (सर्व रा. आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टाटा कम्युनिकेशन कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीत मोकळ्या मैदानात कॉपर असलेली केबल ठेवली आहे. त्यातील 40 हजार रुपये किमतीची एक हजार मीटर केबल वायर आरोपींनी चोरून नेली. पोलिसांनी सुरेश सोनी याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.