… म्हणून टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारली – चंद्रकांत पाटील

0
183

पुणे, दि. २८ (पीसीबी) – काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली. कसब्याची पोटनिवडणूक ही उमेदवारांच्या निवडीपासून ते निकालापर्यंत राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने या ब्राह्मणेतर उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली होती. याची प्रचिती पेठांमधील मतदानाच्या टक्केवारीत उमटल्याचे दिसून आले होते.

भाजपचा कायमचा असलेल्या पेठांमधील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. अपेक्षित साथ न दिल्याचा फटका हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत बसला होता. या पराभवानंतर भाजपमध्ये आत्मचिंतन सुरु झाले. कसब्यामध्ये टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले होते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्यावरही फोडण्यात आलं.

भाजपची उमेदवाराची निवड चुकल्यामुळेच कसब्यात पराभव झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
या सर्व चर्चेवर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना का उमेदवारी दिली, याचं कारण स्पष्ट केलं आहे.