मुंबई,दि.०२(पीसीबी) – अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. पोलीस सुरक्षा नाकारताना त्यांनी सर्व लामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे आणि माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे की, मला ट्रॅफिक क्लिअरन्स पायलट व्हेइकल देऊ नये. मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती अतिशय निराशाजनक आहे. परंतु मला खात्री आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर मला विश्वास आहे. लवकरच इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास प्रकल्पांद्वारे मुंबईत चांगली कामं होती आणि आम्हा मुंबईकरांना लवकरच आराम मिळेल, असं ट्विट अमृता यांनी केलं आहेत.