म्हणत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पतीला अटक

0
267

वाकड, दि. २४ (पीसीबी) -पहिल्या मुलाच्या नावापुढे माझे नाव लावत नाही. मला नव-यासारखी वागणूक देत नाही, असे म्हणत पतीने पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 23) पहाटे रहाटणी येथे घडली.

रुपेश मच्छिंद्र साबळे (वय 32, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 39 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश हा फिर्यादी यांचा दुसरा पती आहे. रुपेश याच्याशी लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसांपासून, तू तुझ्या पहिल्या मुलाच्या नावापुढे माझे नाव लावत नाही. तू मला नव-यासारखी वागणूक देत नाही, असे म्हणत फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. शनिवारी पहाटे फिर्यादी झोपल्या असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करून हाताने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रुपेश याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.