मोहन भागवत यांनी मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितलं

0
3


दि.३ (पीसीबी)- महाराष्ट्रात मतचोरीच्या प्रयोगाची सुरवात कामठी विधानसभा क्षेत्रातून झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ‘वोट चोर, गद्दी छोड’ या काँग्रेसच्या कॅम्पेनची आज कामठी येथून सुरवात झाली. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकमोहन भागवत यांनी मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितलं आहे. देशात मध्यवर्ती निवडणूका लागणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला.

दुसरीकडे, सोमवारी (1 सप्टेंबर) राजधानी पाटणात मतदार हक्क यात्रा संपली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “बिहारमध्ये ‘वोट चोर गद्दी सोड’ ही एक नवीन घोषणा सुरू झाली आहे जी लोकांना खूप आवडत आहे…” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यावर ते पुढे म्हणाले, “चीन आणि अमेरिकेतील लोकही म्हणत आहेत, ‘वोट चोर गद्दी सोड’.”

राहुल गांधी यांनी ‘मतदार हक्क यात्रे’ला संबोधित करताना म्हटले की, “महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणुका चोरला गेल्या. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत सुमारे एक कोटी नवीन मतदार जोडले जातात. आमच्या आघाडीला विधानसभेत लोकसभा निवडणुकीत जितकी मते मिळाली तितकीच मते मिळाली, पण सर्व नवीन मते भाजपच्या खात्यात गेली. का? कारण निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मते चोरली. मी बिहारच्या तरुणांना सांगू इच्छितो की मतदान चोरी म्हणजे हक्क, आरक्षण, रोजगार, शिक्षण, लोकशाही आणि तरुणांच्या भविष्याची चोरी.”

राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले, ही संपूर्ण यात्रा खूप ऐतिहासिक आहे. संपूर्ण पटना भरला आहे. सामान्य जनता जागे झाली आहे आणि आता या बेईमान लोकांना सिंहासन आणि सत्तेवरून काढून टाकतील. लोकशाही मारू इच्छिणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल. दुसरीकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘मतदार हक्क यात्रे’ला संबोधित करताना म्हटले की, हे डबल इंजिन सरकार 6 महिन्यांनंतर राहणार नाही आणि येणारे नवीन सरकार गरीब, महिला, दलित आणि मागास लोकांचे सरकार असेल. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये मते चोरून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्ही सतर्क नसाल तर हे लोक तुम्हाला बुडवून टाकतील.