मोहननगर येथे श्री वेंकटेश्वरा ट्रस्टचा २३ वा बालाजी मंदिर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0
6

मोहननगर – श्री वेंकटेश्वरा ट्रस्ट, मोहननगर संचलित श्री बालाजी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सतीश सीलम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडले.

वर्धापन दिनानिमित्त सकाळी भगवान बालाजींचा विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महायज्ञाचे आयोजन झाले, ज्यामध्ये अनेक भक्तगणांनी श्रद्धेने सहभाग घेतला. या कार्यक्रमानंतर भव्य पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पालखी काळभोरनगर व मोहननगर परिसरात मोठ्या दिमाखात फिरवण्यात आली. संपूर्ण परिसर ‘गोविंदा गोविंदा’ च्या जयघोषाने दुमदुमला.

सायंकाळी भव्य महाआरती संपन्न झाली आणि सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी मंदिर परिसर व आजूबाजूचा भाग भक्तांनी गजबजलेला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ट्रस्टचे संचालक श्री. राजगोपाल नायडू, श्री. अतुल इनामदार, श्री. गोपाळ बिरारी, श्री. रामकृष्ण सीलम, श्री. अजय लढा, श्री. धंनजय कुरुंदकर, श्री. रामचंद्र सकुंडे व श्री. अरविंद वाडकर यांनी मोलाचा सहभाग घेतला.

उत्सव समिती प्रमुख श्री. करण मूर्ती, श्री. श्रीकांत कडाळी, श्री. मनिष काळभोर, श्री. चेतन बेंद्रे आणि श्री. बाबू अण्णा भाले यांनी कार्यक्रम सुरळीतपणे पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

श्री वेंकटेश्वरा ट्रस्ट गेली २३ वर्षे धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असून, भावी काळात आणखी उपक्रम राबवण्याचा संकल्प ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भक्तगणांचे, मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले.