मोहननगर येथे दहशत निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित भाईला अटक

0
840

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : चिंचवड परिसरातील मोहननगर येथे रस्त्यावर कोयता घेऊन नागरिकांना धमकावणा-या स्वयंघोषित भाईला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई रविवारी (दि. 26) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

आशिष देविदास गोरखा (वय 26, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष गोरखा हा रविवारी रात्री कोयता घेऊन मोहननगर येथे सार्वजनिक रस्त्यावर आला. तिथे असणाऱ्या व्यावसायिकांना व पादचारी नागरिकांना त्याने दमदाटी केली. ‘जिलब्या गॅंगला जो कोणी नडणार, त्याची सुट्टी नाही’ असे म्हणत शिवीगाळ करून धमकी देऊन त्याने परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आशिष गोरखा याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.