मोहननगर मधून 26 लाखांचे पार्ट चोरीला

0
9

पिंपरी, दि. 04 (पीसीबी) : देखरेख करण्यासाठी ठेवलेले 26 लाखांचे पार्ट चोरीला गेले. ही घटना 30 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत मोहननगर येथे घडली. रमेश कुमार सहानी, रामविलास कुशवाह अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शैलेश रमण भामरे (वय 50, रा. निगडी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भामरे यांनी त्यांच्या कंपनीच्या मशीन देखरेखीसाठी आरोपींच्या ताब्यात दिल्या होत्या. त्या मशीन मोहननगर येथे संगवी कंपाऊंड येथे ठेवल्या होत्या. तिथून 24 लाख रुपये किमतीचे दोन टेस्टिंग मशीनचे कंट्रोलर आणि दोन लाख रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक स्कूटरची मोटर आणि टेस्टिंग मशीनचे सुटे भाग चोरीला गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.