मोहननगरच्या समस्यांबाबत मारुती भापकर यांचे अजित पवार यांना साकडे

0
91


मोहननगर मध्ये वारंवार होणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे खंडित वीज पुरवठा बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी तक्रार केली. यावर या तक्रारीचे निराकारण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले. मोहननगर परिसरातील विविध समस्यांवरही लक्ष वेधण्यात आले.
ईएसआय हॉस्पिटल रस्त्यावरील समोरील दगडी फरची मुळे नागरिकांचे अपघात होत असून या ठिकाणी ही दगडी फरशी काढून योग्य त्या उपाय योजना राबवाव्यात ही मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा जनसंवाद व मोहननगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, काळभोर नगर, आकुर्डी आदी भागात धावता दौरा केला. यावेळी मोहननगर येथील गायवासरू चौकात भापकर यांनी पवार यांच्याकडे गाऱ्हाणे केले.

मोहननगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते गाय वासरू चौकापर्यंत रस्त्याचे फुटपाथ खूप मोठे झाले असून रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे ट्राफिक जाम होते. या टप्प्यातील फुटपाथची रुंदी कमी करून रस्त्याची रुंदी वाढवावी. ही मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
शिवदर्शन कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शिंदेशाही पगडी असून ती काढून त्या ठिकाणी महाराजांचा जिरेटोप बसवण्यात यावा. ही मागणी करण्यात आली.
मोहननगर सर्वे नंबर 135 व मोहननगर हनुमान मंदिर (खोडाचा गणपती) शिवदर्शन कॉलनी काही भाग एमआयडीसी एक्वेरशनचा भाग आहे. येथील रहिवाशांच्या डोक्यावर कायमस्वरूपी ही टांगती तलवार आहे. मागील 40 -50 वर्षापासून येथील रहिवाशी या कारणामुळे खूप यातना भोगतायेत. त्यामुळे येथील रहिवाशांच्या डोक्यावरील ही टांगती तलवार काढून टाकावी अशी मागणी आम्ही केली. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देऊन ही घरे येथील रहिवाशांच्या नावावर केली जातील असे आश्वासन दिले.
हा निर्णय झाला तर या निर्णयाचा शहरातील एमआयडीसी,प्राधिकरण बाधित सर्वच गुंठेवारी पद्धतीच्या घरांना होणार आहे.
तसेच कामगार रुग्णांसाठी मोहननगर मध्ये १०० बेडचे ईएसआय रुग्णालय सुरू असून त्या रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत.अनेक कामे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे रुग्णालय सुसज्ज 300 बेडचे व्हावे यासाठी सर्व सुसज्जयंत्रणा व तज्ञ डॉक्टर मिळावेत ही मागणी केली. यावरही संबंधित आरोग्य विभागाच्या मंत्र्यांशी व सचिवांशी पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची खूप दुरावस्था झाली असून यामध्ये महापालिका व मेट्रो प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक लहान-मोठे अपघात होतात हातपाय मोडतात त्यामुळे या समस्याचे निराकरण व्हावे ही मागणी केली. त्यावर यावर योग्य उपाय योजना करण्याची सक्त आदेश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
या सर्व गंभीर विषयाबाबत मोहननगर, रामनगर, महात्मा फुलेनगर चिंचवड स्टेशन काळभोर नगर आकुर्डी आदी विभागातील कार्यकर्ते, महिला व नागरिकांनी देखील यातील काही समस्या अतिशय पोटतिडकीने मांडल्या. यावर अतिशय सकारात्मक भूमिका पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विशद केली.
तसेच महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखडा (डीपी) चा महाघोटाळा, कुदळवाडीतील लघुउद्योजक व्यापारी यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत तेथील बाधितांबाबत सकारात्मक निर्णय व्हावेत. मनपा शाळा चे होणारे खाजगीकरण रोखावे. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
या सर्व प्रश्नांवर पिंपरी चिंचवड महापालिका, मेट्रो प्रशासन, महावितरण प्रशासन यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलावीत अशी अपेक्षा आहे.