मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग

0
606

नवी दिल्ली, दि १८ (पीसीबी) – मुबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिम कासकर याच्यावर पाकिस्तानात विषयप्रयोग झाल्याने तो अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून आजवर १७ वर मोठे अतिरेकी मारले गेले किंवा त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याने दाऊदचासुध्दा अशाच पध्दतीने खात्मा होणार की काय यावर माध्यमांतून विविध बातम्या सुरु आहेत. सोशल मीडियावर दाऊद ट्रेंडींग आहे.

भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #dawoodibrahim ट्रेंड होत आहे. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले असून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली आहे. दाऊदसंदर्भात सरकारी यंत्रणाकडून अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.
सोशल मीडियावर रविवारी रात्री #DawoodIbrahim #karachi हे hashtag ट्रेंडिगमध्ये आले. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उजव्या विचारधारेच्या युजर्सनी पाकिस्तानातून मोठी बातमी अशा आशयाची पोस्ट केल्याने चर्चेला जोर आला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, दिल्लीतील काही पत्रकारांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानातील माध्यमे, सरकारी यंत्रणा यांच्याकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचा समावेश आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो वॉन्टेड आहे.

दरम्यान दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला कोणी विष दिलं, याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणापासूनच दाऊद मारामारी, खंडणी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता.

दाऊदला विष देण्यामागे तर्क वर्तवले जात आहेत. भारताविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आहे. याआधी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ ​​अबू हंजलासह अनेक वॉन्टेड दहशतवादी मारले गेले आहेत. दाऊद इब्राहिम आयएसआयच्या कडेकोट सुरक्षेत असतो. त्याच्यापर्यंत सामान्य माणूसही पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जातेय.

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंड
डी कंपनीचा प्रमुख असलेला दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता. या हल्ल्यात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोकं जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर भारताने दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने त्याच्याविरुध्द अनेकवेळा पुरावेदेखील दिले आहेत. पण दाऊद पाकिस्तानात लपला असल्याचं पाकिस्तान कबूल करत नाही.

कोण आहे दाऊद?
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनत दाऊदचं पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर असं आहे. डिसेंबर १९९५ मध्ये महाराष्ट्रतल्या रत्नागिरीमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबर पदावर कार्यरत होते. सात भाऊ आणि चार बहिणी असं दाऊदचं कुटुंब आहे. यातल्या सर्वात लहान असलेल्या हुमांयू कासकर याचा सहा वर्षापूर्वा कॅन्सरने मृत्यू झाला. त्याच्यावर पाकिस्तानातच उपचार सुरु होते. १९८१ मध्ये दाऊदच्या मोठ्या भावाची पठाण गँगने मुंबईत निर्घृण हत्या केली. याच घटनेनंतर दाऊदची गुन्हेगारी क्षेत्रात एन्ट्री झाली.

इंटरनेट सेवा बंद Internet Shut Down in Pakistan:
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता भारतीय युजर्स वर्तवत आहेत. मात्र, पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ऑनलाईन रॅलीमुळे सरकारने इंटरनेट बद केल्याचे आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षातर्फे केला जात आहे