मोशी, दि. २१ (पीसीबी) – मोशी प्राधिकरण येथील क्राऊन नावाच्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई केली. त्यात चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.
स्पा मॅनेजर खतिजा मोजिब खान (वय 21, रा. भोसरी), स्पा मालक अजय अरुण वाळके (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चार महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांकडून स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.