मोशी परिसरात हातभट्टीची दारू जप्त; महिलेवर गुन्हा

0
4

दि.०६(पीसीबी)-विक्रीसाठी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू जवळ बाळगणाऱ्या एका महिलेवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. ही घटना रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी ६.४५ वाजता, लक्ष्मी चौक, मोशी येथे घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप गंगावणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका महिला आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तिच्या ताब्यात ३८ हजार ५०० रुपये किमतीची ३८५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी घेऊन जात होती. पोलिसांनी सापळा रचून हा साठा जप्त केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.