मोशी, निगडी येथे सांडले ऑईल

0
245

मोशी, दि. ५ (पीसीबी) – ऑईल सांडल्याच्या रविवारी (दि. 4) दोन घटना घडल्या. पहिली घटना मोशी येथे येथे घडली. तर दुसरी घटना निगडी येथे घडली.

मोशी परिसरातील अलंकापुरम चौक ते वडमुखवाडी या दरम्यान एका डंपरमधील ऑईल सांडले. डंपरमधील ऑईलची टाकी लिक झाल्याने हे ऑईल सांडले. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर गेल्यानंतर डंपर चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर डंपर बाजूला थांबवण्यात आला.

मोशी उपअग्निशमन केंद्राच्या जवानांनी ऑईल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.

ऑईल सांडल्याची दुसरी घटना निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकात घडली. प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी ऑईल सांडलेला रस्ता धुवून ऑईल काढले. रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहने घसरण्याची तसेच गंभीर अपघाताची शक्यता होती.