‘मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं’,मनसेचा किशोरी पेडणेकरांना टोला

0
318

मुंबई , दि.२९ (पीसीबी)- भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. ”मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं” असा टोला त्यांनी पेडणेकरांना लगावला आहे.

”मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे, मांजर लपून दूध पीत होती” असे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ”माझा या सदनिकांशी काहीही संबंध नसून येथील एक जरी गाळेधारक माझा या सदनिकांशी संबंध आहे, असे म्हणाला, तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. तसेच न्यायव्यवसस्था आणि पोलिसांवर विश्वास असल्याचेही त्या म्हणाल्या.