मोरवाडी मध्ये घराला आग

0
89

पिंपरी , दि.२० जुलै (पिसीबी) – पिंपरीतील पीसीएमसी मेट्रो स्टेशनपासून काही अंतरावर मोरवाडीत एका घराला शुक्रवारी (दि.19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडीतील जय मल्हार हॉटेलच्या शेजारी एका घरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशात पसरले होते. आगीची वर्दी मिळताच सहा मिनिटात महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी आगीचे लोट छताच्या वर दिसू लागले. अग्निशमन जवानांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील गॅस सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढला.

आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र घरातील साहित्य जळून खाक झाले.अग्निशमन विभागाचे फायरमन भूषण येवले, चालक तथा यंत्र चालक विशाल फडतरे, ट्रेनी फायरमन प्रतीक खांडगे, प्रतिक महेरिकर, स्वप्नील उताळे, अनिकेत गोडसे, राम शेडगे, कौस्तुभ जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.