पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : पिंपरी मोरवाडी येथे ५ न्यायालय फर्निचर सहित तयार असून या ठिकाणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड मधील वकिलांनी वारंवार मागणी केली होती.
सदर न्यायालयांच्या प्रस्तावास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून सदरचा प्रस्ताव निधी अभावी शासन स्तरावर प्रलंबित आहे. परंतु सदरच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत इतर दोन न्यायालये पिंपरी मोरवाडी येथे सुरू करण्यासाठी आज रोजी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन साहेब तसेच पिंपरी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश श्री. एम. जी. मोरे यांनी आज रोजी मोरवाडी येथील जुन्या न्यायालयाची पाहणी केली. यावेळी आकुर्डी येथील महापालिकेचे सुरू असलेले दिवाणी न्यायालाय मोरवाडी येथे स्तलंतरित करावे जेणेकरून वकिलांना व पक्षकारांना जवळ जवळ दोन्ही न्यायालय होऊन त्रास कमी होईल अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असो चे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी केली.
तसेच यावेळी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, ॲड. दिनकर बारणे, ॲड. गोरक्ष लोखंडे (महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग- सदस्य), ॲड. श्रीराम गालफाडे, ॲड. निलेश भिसडे, ॲड. चौरे, ॲड. प्रसन्न लोखंडे,टायपिस्ट संघटनेचे श्री शुभम मचाले उपस्थित होते.