मोरया सामाजिक प्रतिष्ठान चा ३१ वा वर्धापन दिन सोहळा गा. दी. माडगुळकर सभागृह येथे उत्साहात व दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली माने (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग – सीआयडी, पुणे) या उपस्थित होत्या .संस्थेचे संथापक अध्यक्ष डॉ गणेश मा अंबिके म्,धिरज कुलकर्णी (SOS पुणे विभाग प्रमुख), विनोद शंभाकर (SOS प्रकल्प अधिकारी), मा. विजय बोत्रे (तुकाराम गाथा अभ्यासक), मा. नरेंद्र मेहेर तसेच पार्थ वाघमारे (Bajaj Finserv प्रतिनिधी) आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या संचालक मंडळातील डॉ. राखी झोपे, डॉ. संतोष धुमाने, डॉ. संतोष पवार, मा. नितीन पिंगळे, डॉ. सुहास लुंकड, डॉ. संजय वाडकर, सौ. मालती पुर्णे, डॉ. सरोज आंबिके, डॉ. गणेश आंबिके, मा. प्रदीप सायकर, मा. जालिंदर करडीले तसेच Sri Balaji University अंतर्गत SriBUILD विभागाच्या डॉ. मनीषा शुक्ला (प्रमुख) व डॉ. दीपली रहेजा (उपप्रमुख) यांची उपस्थिती लाभली. मा. राजाराम वंजारी हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ गणेश मा अंबिके यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात संस्थेने ३१ वर्षात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे माहिती दिली आणि गल्ली तून सुरू झालेली संथेचं काम आज सयुक्त राष्ट्र संघा बरोबर कसे चालते याची माहिती दिली तसेच मोफत पॅरामेडिकल अभ्यासक्रमा बाबत सर्व माहिती दिली
अध्यक्षीय भाषणात श्रीमती वैशाली ताई माने यांनी मुली शिक्षित व स्वावलंबी असणे किती आवश्यक आहे यावर प्रभावी मार्गदर्शन केले तसेच महिलांनी पुढे येऊन वेळ काढून समाजासाठी काम करणाऱ्या संस्था ना मदत केली पाहिजे अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या
डॉ. गणेश आंबिके यांना शुभेच्छा देऊन भविष्यात मोरया सामाजिक प्रतिष्ठानसोबत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात मा. विजय बोत्रे यांनी संस्थेला शुभेच्छा देत डॉ. गणेश आंबिके यांचा उल्लेख “पुण्यपुरुष” असा गौरवपूर्ण शब्दांत केला.
या वेळी मोरया सामाजिक प्रतिष्ठानकडून “मोरया पुरस्कार” जाहीर करण्यात आले. यापैकी प्रथम दोन पुरस्कार मा. वैशाली माने अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे व मा. रोहित टिळक उपाध्यक्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांना जाहीर करण्यात आले. सर्व संचालक मंडळातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच डॉ. गणेश आंबिके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेतील यशस्वी विद्यार्थी डॉ विनायक देंडगे, संतोष चव्हाण, आरती विभुते, कन्हैया रॉय, प्रवण वाघमारे, साक्षी देशमुख , केतकी गोसावी, अजिंक्य जाधव, ज्योतीराम मोरे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन मा नितीन साळी यांनी तर आभार प्रदर्शन मा. नितीन पिंगळे यांनी केले.
राष्ट्र गीत घेऊन कार्यक्रम पूर्ण झाला
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.












































