मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
491

वडगाव मावळ,दि.१६(पीसीबी) – मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती चौक ते श्री पोटोबा महाराज मंदिर पर्यंत भारतमातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच मोरया ढोल पथकाने वादनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने देशभक्तीपर कला सादरीकरण करत भारताचा नकाशा हुबेहूब पूर्ण करून आपल्या देशाप्रती असलेली देशभक्तीचे सादरीकरण केले.

तसेच नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे पाचशे फूट लांबीचा तिरंगा ध्वज मिरवणुकीत सामील केला होता. यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके, तालुकाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, वडगाव नगरपंचायत नगरसेवक, नगरसेविका आणि वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वडगाव शहरातील नागरिक अमृत महोत्सवी मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून मोरया महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा, कार्याध्यक्षा, उपाध्यक्षा, संचालिका आणि सर्व सदस्या यांनी आपल्या देशाचा अमृत महोत्सवी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप सारी मेहनत घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांनी सर्व महिला भगिनींचे तसेच मोरया ढोल पथकातील सर्व सभासदांचे आभार व्यक्त करत कौतुक केले.

– प्रतिक कारळे, प्रतिनिधी( पीसीबीटूडे)