मोबाईल विकत घेताच दुकानातूनच गेला चोरीला, एकावर गुन्हा दाखल

0
486

दिघी, दि. ६ (पीसीबी) – मोबाईल शॉपी मध्ये जाऊन मोठ्या हौसेने विकत घेतलाला मोबाईल घ्या काही मिनीटात दुकानातूनच चोरीला गेला आहे. ही घटना दिघी येथील एका मोबाईल शॉपमध्ये घडली आहे.

याप्रकरणी विशाल हिरालाल बागुल (वय 27 रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून शुभम खंदारे (रा.भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यांदी हे त्यांच्या मित्रासोबत दिघी येथील आई माताजी मोबाईल शॉपमध्ये मोबाईल खरेदीसाठी गेले. तिथे जाऊन त्यांनी 21 हजार रुपयांचा ओपो कंपनीचा मोबाईल विकत घेतला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादीच्या नकळतपणे हातचालाखीने त्यांचा नवीन फोन चोरला. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.