मोबाईल चोरून त्यातील ॲप द्वारे खात्यातून 94 हजार रुपये चोरले

0
505

डुडुळगाव , दि. २४ (पीसीबी) – आता केवळ मोबाईल हँडसेट चोरीला गेल्यानंतर मोबाईल चोरला असे होत नाही तर या घटनेतून तुमच्या मोबाईल द्वारे तुमच्या इतर गोष्टींना देखील धक्का लावला जाऊ शकतो हे समोर आले आहे. यामध्ये चोराने मोबाईल चोरून त्यातील बँकिंग द्वारे बँक खात्यातील तब्बल 94 हजार रुपये काढून घेतले आहेत हा सारा प्रकार डुडुळगाव येथे 20 ऑगस्ट रोजी घडला.

याप्रकरणी संतोष विक्रम बर्डे (वय 35 रा. डूडूळगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ऑफिसमध्ये असलेला 5 हजार रुपयांचा फोन चोरीला गेला. यावेळी फोनमधील UPI aap वापरून चोराने 9096031171 या क्रमांकावर संपर्क 94 हजार 801रुपये ट्रान्स्फर करून घेतले.दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.