मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

0
754

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – सोसायटीच्या गेट समोर मोबाईल फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन तीन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री अकरा वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

धीरज उत्तम लोणकर (वय २३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोणकर हे बुधवारी रात्री अकरा वाजता त्यांच्या सोसायटीच्या गेट समोर मोबाईलवर बोलत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी लोणकर यांचा सात हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.