धाराशिव, दि. 06 (पीसीबी) : धाराशिव मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार कैलास पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी शिवसेना शाखा मोहननगर येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते मोफत मतदान कार्ड चे स्मार्ट कार्ड वाटप व नवीन मतदान नोंदणी शिबिराची उद्घाटन करण्यात आले.
पुन्हा निवडून आल्याबद्दल शिवसेना शाखेच्या वतीने आमदार पाटील यांचा श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर नवीन मतदान नोंदणीचे फॉर्म व ज्येष्ठ नागरिकांचे मतदान कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप आमदारांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका मीनल यादव,शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव, शशिकांत पांडाळे, नागेश जी नामदे, मधुसूदन आंबुसकर, सोमनाथ अलंकार, मोहनजी धापटे, रघु भाऊ कदम, काशीद काका, भोसले साहेब, दत्तात्रय धावडे, राजू खजिनदार, निलेशजी सुबे, संजय वडपल्ली, संजोग महाजन असे अनेक शिवसैनिक व मोहन नगर मधील नागरिक यावेळी उपस्थित होते.











































