मोदी सरकराचा दिलासा, गॅस २०० रुपयांनी स्वस्त

0
313

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीतच होणार असल्याच्या माहितीला पुष्टी देणारी आणखी एक बातमी आली आहे. नरेंद्र मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर २०० रुपयांची सूट दिलेली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आलीय.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ७५ लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकाही डोळ्यासमोर आहेत. त्या अनुषंगाने केंद्राने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानुसार आता गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

भाजपच्या दृष्टीने देशातील वातावरण नकारात्मक होत असल्याने केंद्र सरकार मतदारांना खूश कऱण्यासाठी आणखी अशा सवलतींचा वर्षाव करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातं आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी चे दर सुध्दा कमी होण्याचा अंदाज आहे. महागाईवर मात कऱण्यासाठी सरकार हा फंडा वापरून त्रस्त जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणूक घ्यायची तर सर्वात कळीचा मुद्दा ठरणाऱ्या महागाईचा निकाल लावण्याकडे मोदी यांचा कल असून विरोधकांच्या शिडातील हवा काढून घेण्याची ही खेळी आहे. या घोषणेचा निवडणुकिसाठी फायदा होऊ शकतो.दरम्यान, भाजपने देशातील सर्व हेलिकॉप्टर बूक केल्याचा मोठा गौप्यस्फोट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक तयारीचाच हा भाग असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे