मोदी, शाह यांच्याबरोबर बंद खोलीत अजितदादांची अर्धा तास चर्चा

0
416

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक बैठका, चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बैठका पार पडल्या. विरोधकांची बैठक बेंगळुरू येथा पार पडली तर सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक दिल्लीत येथे पार पडली.

भाजपच्या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काल दिल्लीला गेले होते. पण या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम दिसुन आला. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. परंतु त्यांच्यासोबत अजित पवार बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेला निघाले तेव्हा अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

NDAच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक झाल्याची माहीती आहे. अजित पवार, अमित शाह, जे पी नड्डा, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे. तर या बैठकीतील चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. बैठक संपल्यानंतर सर्व नेते बाहेर पडले, त्यानंतर या 4 नेत्यांत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.